डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे iPhone च्या किंमती $2000 पेक्षा जास्त होण्याची शक्यता

0

अमेरिकेत लवकरच iPhone ची किंमत $2000 (सुमारे ₹1,65,000) पेक्षा जास्त होऊ शकते. कारण माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन व इतर देशांवर लावलेले आयात कर (टॅरिफ) पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे.

Wall Street Journal च्या अहवालानुसार, iPhone 16 Pro (256 GB) या मॉडेलसाठी लागणाऱ्या पार्ट्सचा खर्च $550 वरून थेट $820 पर्यंत जाणार आहे. ही 54 टक्क्यांनी वाढ चीनमधून येणाऱ्या आयातीत लागू करण्यात आलेल्या नव्या टॅरिफमुळे होणार आहे, असे TechInsights चे तज्ज्ञ वेन लॅम यांनी सांगितले.

जरी iPhone चे बहुतांश मॉडेल्स चीनमध्ये असेंबल केली जात असली, तरी त्यासाठी लागणारे पार्ट्स हे जगभरातून आणले जातात. त्यामुळे सर्वसाधारण उत्पादन खर्चातही 43 टक्क्यांनी वाढ होणार आहे, असे Reuters च्या अहवालात म्हटले आहे.

याचा थेट परिणाम म्हणजे iPhone 16 चे बेसिक मॉडेल सुमारे $1500 (₹1.25 लाख) ला मिळू शकते. सध्या हे मॉडेल $799 ला मिळते. iPhone 16 Pro Max (1TB) ची किंमत सध्याच्या $1,599 वरून थेट $2,300 पर्यंत जाऊ शकते.

ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनविरोधात टॅरिफ लागू केल्या होत्या, तेव्हा Apple ला काही प्रमाणात सूट मिळाली होती. पण यावेळी Apple ला कोणतीही सवलत मिळालेली नाही.

उत्पादनात अडचणी, विक्रीत घट

जरी iPhone 16 मध्ये चांगली प्रोसेसर, कॅमेरा, बॅटरी आणि Apple Intelligence यांसारखी फीचर्स असली तरी ग्राहक इतकी जास्त किंमत मोजतील की नाही, हे सध्या स्पष्ट नाही. आधीच iPhone विक्रीत घट पाहायला मिळते आहे.

Wall Street Journal च्या माहितीनुसार, iPhone मध्ये सर्वात महाग पार्ट म्हणजे मागचा कॅमेरा – सुमारे $127. हा कॅमेरा जपानमध्ये तयार होतो. प्रोसेसर (तैवान) सुमारे $90, तर डिस्प्ले (दक्षिण कोरिया) $38 ला मिळतो. अमेरिकेत तयार होणारा एकमेव महत्त्वाचा पार्ट म्हणजे मेमरी चिप – ज्याची किंमत $22 आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाणिज्य सचिव हावर्ड लटनिक यांनी असे सांगितले आहे की, भविष्यात सर्व iPhone असेंब्ली अमेरिका मध्येच केली जावी, असा त्यांचा मानस आहे. “लाखो कामगार जे छोट्या स्क्रूज बसवतात, हे सगळं काम अमेरिका मध्ये येईल,” असे ते म्हणाले.

पण असं झाल्यास iPhone चा उत्पादन खर्च आणखी प्रचंड वाढेल, कारण अमेरिकेतील मजुरीचा खर्च जास्त आहे. आणि तरीही इतर देशांतून येणाऱ्या पार्ट्सवर कर लागूच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.