Bigg Boss Marathi: ताटाला लाथ मारल्यामुळे निक्कीवर नेटकऱ्यांचा रोष
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात दिवसेंदिवस वादविवाद वाढत चालले आहेत. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील नातेसंबंध सतत बदलताना दिसत आहेत. घरात दोन गट पडले आहेत, आणि प्रत्येक गटातील सदस्य एकमेकांच्या वागण्यामुळे नाराज आहेत. निक्की आणि अभिजीतच्या वाढत्या मैत्रीचा अरबाजला राग आहे, तसेच ए टीमसह बी टीममधील सदस्यांनाही ही मैत्री अस्वस्थ करतेय. आता निक्की आणि इरिनामध्ये संघर्ष उफाळल्याचे दिसत आहे.
निक्कीने जेवणाच्या ताटाला मारली लाथ
बिग बॉस मराठीच्या घरात निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीमुळे अरबाज नाराज आहे, तर अरबाज आणि इरिनाची जवळीक निक्कीला खटकतेय. इरिनामुळे निक्कीचे अरबाज आणि वैभवसोबत भांडण झाले. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये घरात मोठा गोंधळ झाला. इरिनाने अरबाजला खाऊ-पिऊ घातल्याचे निक्कीनं आवडले नाही, ती म्हणाली, “बरं झालं इरिना नॉमिनेट झाली, बाहेर गेली तरी चालेल, ती माझ्या ग्रुपमध्ये नव्हतीच”.
नेटकऱ्यांचा संताप उफाळला
निक्कीने इरिनाला लक्ष्य करताच वैभव संतापला आणि तिला ताकीद दिली, “आता हे खूपच होतंय”. यानंतरही निक्कीनं वैभवशी वाद घातला आणि रागाच्या भरात टेबलावर ठेवलेली दोन ताटं लाथाडली. अरबाजने मग खाली पडलेली ताटं उचलली. कालच्या एपिसोडमध्ये हा सर्व प्रकार पाहून नेटकरी संतापले. ज्या अन्नाला आपण देवाचं रूप मानतो, त्या ताटाला लाथाडल्यावर निक्कीनं सोशल मीडियावर ट्रोल होण्यास सुरुवात झाली.
नेटकरी म्हणाले, “त्या निक्कीला बाहेर काढा”
निक्कीच्या वागण्यावर एका नेटकऱ्याने कमेंट केली, “आपण मेहनत करून पैसे मिळवतो, कारण दोन वेळेचं अन्न ताटात घेता यावं. जेवणाआधी वदनिकवळ म्हणणारी संस्कृती आपली आहे. मोठ्यांचा अपमान तर होतच आहे, पण आता रागाच्या भरात अन्न घेतलेल्या ताटालाही लाथाडताय. माज असावा पण इतका नको की नंतर लाज वाटेल”. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “ज्या ताटात जेवण करतो, त्याच ताटाला लाथ मारते, हिची संस्कृतीच वेगळी आहे”.
बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची लोकप्रियता
कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नव्या अंदाजात, नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या सीझनने थोड्याच कालावधीत विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने गाजवला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची हटके स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनला अधिक लोकप्रिय बनवत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.